जाणून घ्या अट्रोसिटी कायदा व त्या संबंधित सम्पूर्ण आवश्यक माहिती जी प्रत्येक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला माहिती असायलाच पाहिजे.
अट्रोसिटी ऍक्ट अट्रोसिटी कायद्याला मराठीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,1989 असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघाचा मानवी हक्क जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास चाळीस वर्षे लोटल्यानंतर भारतातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी हा कायदा करावा लागला.हा कायदा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या रक्षणासाठी तयार केला गेला आहे ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे.परंतु हे रक्षण नेमके कोणापासून व का हा फार मोठा प्रश्न उपस्थित होतो.हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याचं उत्तर देताना भारताच्या पुर्वइतिहासात जाऊनच आपल्याला पाहावं लागेल तोपर्यत त्याचा व्यवस्थित उलगडा होणार नाही. भारतामध्ये हजारो वर्षापासून इथल्या उच्चवर्णीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इथे हजारो प्रकारच्या जाती निर्माण केला आहेत व आपली वर्चस्ववादी व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे.म्हणून यामध्ये जातीचा विचार करत असताना वर्णाचा विचार सुद्धा करावा लागेल.कारण या सर्व जाती या वर्णातुनच आलेल्या आहेत. भारतातील वर्णव्यवस्था...