डॉ. बबन जोगदंड-माणसातील अधिकारी व अधिकाऱ्यातील माणूस एक प्रचंड सकारात्मक उर्जा असलेलं आदर्श व्यक्तीमत्व!-अँड.के.टी.चावरे (उच्च न्यायालय मुंबई)
डॉ.बबन जोगदंड हे महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा' या शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये गेल्या 16 वर्षांपासून संशोधन अधिकारी या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.या संस्थेमध्ये ते स्वतः वर्ग-1 च्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतात.त्याचबरोबर ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही नियमित मार्गदर्शन करत असतात.त्यांनी गेल्या सहा वर्षापूर्वी पुण्यामध्ये स्वयंदीप करियर अकॅडमी ही गरीब व होतकरू मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची अत्यंत दर्जेदार अकॅडमी सुरू केली आहे.आतापर्यंत येथून अनेक विद्यार्थी घडले आहेत व बरेच जण अधिकारी पदावर पोहचले आहेत.जोगदंड सरांचे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात वेगवेगळे वर्तमानपत्रे, मासिके,
नियतकालिके यामध्ये सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात.विशेषत: शासनाच्या 'लोकराज्य' या लोकप्रिय मासिकात सुद्धा ते सातत्याने स्पर्धा परीक्षेसंदर्भात लिखाण करत असतात.त्यांनी आतापर्यंत 20 विषयात पदव्या संपादन केलेल्या असून पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात पी.एच.डी ही सर्वोच्च पदवी प्राप्त केलेली आहे.
अत्यंत बिकट व प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन त्यांनी शिक्षणाचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.ते एक उत्तम लेखक,
वक्ते,संपादक,चळवळीचे अभ्यासक व उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत. त्याचबरोबर एक चांगले मार्गदर्शक आहेत.त्यांची आत्तापर्यंत दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.आणखी काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.विशेषत: त्यांचा महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशभर फार मोठा जनसंपर्क आहे.महाराष्ट्रातील अनेक आय.ए.एस,आय.पी.एस.अधिकारी यांच्याशी त्यांची ओळख असून त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे.त्यामुळे त्यांच्यावर 'द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग'अर्थात 'मानवी संबंधाचा बादशहा' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
प्रशासन,पत्रकारिता समाजकार्य, संघटन,इव्हेंट मेनेजमेंट या क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक व्याख्याने दिली आहेत.ते यशदाच्या' यशमंथन' या मासिकाचे संपादक म्हणूनही कार्यरत आहेत.पूर्वी त्यांनी पत्रकारिता केली व काही काळ आकाशवाणीकरिता उद्घोषक म्हणूनही काम केले आहे तसेच त्यांनी पुण्यामध्ये स्वयंदीप नावाची पुस्तक प्रकाशन ही संस्था स्थापन केली असून स्वयंदीप प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची आतापर्यंत 50 हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
सांगायचे म्हणजे त्यांचा शिक्षण हा ज्ञानार्जनाचा छंद असून ते दरवर्षी एक डिग्री घेत असतात.त्यांनी आतापर्यंत एकूण 6 विषयात एम.ए.केलेले आहे व भविष्यात कमीत कमी 25 वेगवेगळ्या विषयात पदव्या मिळवण्याचा त्यांचा संकल्प आहे.आतापर्यंत त्यांनी 25 देशांचे दौरे केले असून ते सातत्याने चळवळीमध्ये सक्रिय असतात.अनुसूचित जाती-जमातींच्या अधिकाऱ्यांचे संघटन असलेल्या 'महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम' या संघटनेचेही ते राज्याचे सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत. तर असे आहे अष्टपैलू असलेले डॉ.बबन जोगदंड सरांचे व्यक्तीमत्वं.
पहिल्यांदा आपले मनपुर्वक अभिनंदन!!दैनिक पुण्यनगरीमध्ये व इतरही अनेक वर्तमानपत्रात आपल्यावर जे लेख प्रकाशित होत असतात.त्यातील एक ना एक गोष्ट खरी आहे व त्या सर्व गोष्टी मी स्वतः आदरणीय डॉ.बबन जोगदंड सर यांच्या सोबत राहून अनुभवल्या आहेत.तसेच आपल्यावर जे King of Human Networking नावाचं पुस्तक प्रकाशित झाले आहे ते सुद्धा पुस्तक मी वाचलं आहे.ते पुस्तक माझ्याही संग्रही आहे.त्या पुस्तकात जेवढी मान्यवर मंडळी आहेत त्या सर्वांनी आपल्यावर व्यक्त केलेली जी मत्ते आहेत ती अगदी सत्य व बरोबर आहेत.
डॉ.बबन जोगदंड सर हे खरचं एक उच्चविद्याविभूषित व्यक्ती आहेत.त्यांची ज्ञानाची भूक प्रचंड आहे.एकूण पंधरा विषयात त्यांनी पदव्या प्राप्त केलेल्या आहेत व अजूनही त्यांची ज्ञानार्जनाची भूक अजूनही संपलेली नाही.आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी या पदव्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या आहेत.कारण त्यांच्या घरची आर्थिक स्थिती सुद्धा फार बेताची होती.त्यांनी नांदेड येथे अतिशय तुटपुंज्या पगारीवर एक पत्रकार म्हणून काम केले.तरीही जीवनात काहीतरी मोठे काम करून दाखवावे या उदेशाने झपाटलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही.हा ध्यास घेऊनच सरांनी पुणे गाठले.अहोरात्र मेहनत करून,अभ्यास करून नंतर त्यांना पुण्यातील महाराष्ट्र शासनाच्या यशदा या शिखर संस्थेत अतिशय महत्त्वाच्या व मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळवीली व त्या संधीचे त्यांनी खरचं सोने केले.
आज ते या शिखर संस्थेत एक संशोधन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.या संस्थेत आपलं एक अधिकारी म्हणून प्रशासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो.ते कर्तव्य योग्यरीत्या पार पाडत त्यासोबतच ते आपलं सामाजिक कर्तव्यही अतिशय नेटाने व अतिशय कुशलतेने पार पाडत असतात.त्यात त्यांना भेटायला आलेल्या गरजू माणसांना अगदी जातीने व आपल्यापरीने शक्य असेल त्या स्वरूपात मदत करत असतात.
डॉ.बबन जोगदंड सरांचा एक विशेष गुण मला फार आवडतो तो गुण म्हणजे ते एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत तसेच ते एक उच्चविद्याविभूषित आहेत ही गोष्ट तर अगदी अभिमानास्पद व खरी आहेच.परंतु,त्याहुनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे हे सर्व वैभव असतानाही त्यांनी कधीही आपली जनसामान्यासोबत असलेली नाळ तुटू दिली नाही हा सर्वात महत्त्वाचा गुण त्यांच्यात आहे.
त्यांच्याकडे बरीच माणसे आपापली कामे घेऊन येतात.त्यामध्ये जशी प्रशासनातील मोठमोठ्या हुद्द्यावर असणारी लोक येतात तसेच त्यासोबत गरिब व अतिशय सामान्य माणसे देखील येतात.अशा माणसांना सुद्धा ते अगदी समाधानकारकरित्या बोलतात.त्यांच्या बोलण्यात व वागण्यात कसल्याच प्रकारची अतिशयोक्ती व बडेजावपणा नसतो.त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्या व्यक्तीला असं वाटतच नाही की,जोगदंड सर हे आपलं काम करायला किंवा आपल्याला टाळत आहेत.एवढी सकारात्मक देहबोली आहे त्यांची.त्यांना भेटून आल्यावर मनाला अगदी समाधान वाटावे असच व्यक्तीमत्व आहे त्यांचं.वागण्यात कसल्याच प्रकारचा Attitude नाही त्यांच्या.ते स्वभावाने अतिशय नम्र व स्पष्टवक्ते आहेत.आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ते अगदी आदरयुक्त व नम्रपणे बोलतात.
एवढा मोठा मी अधिकारी आहे व महाराष्ट्र शासनाच्या यशदा या शिखर संस्थेत अतिशय महत्त्वाच्या पदावर असून मी कशाला स्वता:हून सामान्य तसेच वयाने लहान असणाऱ्या माणसाला बोलू किंवा फोन करू अशाप्रकारचा अहंकार त्यांच्या अंगी नाही.बऱ्याच जणांना वाटेल की,ही अत्यंत साधी गोष्ट आहे.परंतु ही गोष्ट आवर्जून सांगण्याचा उद्देश हा आहे की बहुतांश अधिकारी अशाप्रकारचं वर्तन करताना दिसून येतात.म्हणून ही गोष्ट साधी राहत नाही.अशा गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावाच लागतो.कारण बहुतांश अधिकारी वर्गाला हे माहीतच नाही की,आपण जनतेचे नोकर आहोत.परंतु डॉ.बबन जोगदंड सर हे खरोखरच यास अपवाद आहेत.
मला वाटते की ते त्यांच्या या गुणामुळेच सर्वामध्ये लोकप्रिय झाले असावेत.त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी मानवी संबंधाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळे तयार केले आहे.म्हणून त्यांचा हा अतिशय चांगला गुण इथे मला आवर्जून सांगावासा वाटतो.कारण महाराष्ट्र राज्यात बौद्ध समाजात उच्च शिक्षण घेतलेल्या व प्रशासनातील सर्वात मोठमोठी पदे भुषवलेल्या ल़ोकांची काही कमी नाही.शेकडो पदव्या मिळवलेल्या लोकांची इथे कमी नाही.परंतु शिक्षणासोबतच आपण आपल्या भाऊबंदासाठी, समाजबांधवासाठी काय करतो व त्यांच्यासोबत कसे वागतो,त्यांच्या भविष्याबाबत काय विचार करतो या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
बहुतांश लोकामध्ये शिक्षणाचं व ज्ञानाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे परंतु हीच शिक्षित लोक आपल्याच समाजबांधवासोबत किंवा इतर सामान्य बांधवासोबत चांगले वागत नाहीत.त्यांचा व्यवहार हा माणूस म्हणून तर अगदी शुन्यच वाटतो.अशी खूप उदाहरणे देता येतील जी लोक उच्चशिक्षित व प्रशासनात मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत परंतु त्यांच्या बोलण्यात,(Toning)वागण्यात अतिशय कमालीचा आखूडपणा (Attitude) दिसून येतो.अशी माणसं अगदी उच्चशिक्षित व मोठ्या पदावर असूनही ती सामान्य माणसाच्या मनात आपलं स्थान निर्माण करू शकत नाहीत.ही आजची वर्तमान वस्तुस्थिती आहे.परंतु डॉ. बबन जोगदंड सर हे यास अपवाद आहेत.ते लहानांशी,सामान्य माणसांशी तसेच ते मोठ्या श्रेणीच्या अधिकारी वर्गासोबतही समान पद्धतीने वागतात.जमेल तशी आपल्या परीने मदत करतात.अतिशय चांगला असा सुंसवाद साधतात.
त्यांचा असाच एक प्रेरणादायी प्रसंग मी सांगू इच्छितो की,डॉ.बबन जोगदंड सर हे व्याख्यानानिमित व इतर कामानिमित्त जेव्हा जेव्हा नांदेडला येतात तेव्हा तेव्हा ते मला आवर्जून फोन करतात.असेच एकदा नांदेड येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्या कार्यक्रमाची सांगता झाल्यावर वसमत येथून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणारी एक गरिब घरची होतकरू मुलगी जोगदंड सरांना भेटायला आली होती.त्या मुलीने आपण आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाही अशी खंत व्यक्त केल्यानंतर जोगदंड सरांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलीला आपल्या जवळची काही उपयुक्त पुस्तके तसेच काही आर्थिक मदत व अतिशय पोटतिडकीने मोलाचं मार्गदर्शन करून त्या मुलीत शिक्षणाविषयी व तिच्या ध्येयाविषयी आशावाद निर्माण केला.ही गोष्ट मी स्वतःपाहीली आहे.एवढेच नाही तर सरांची पुणे येथे एक स्वंयदीप नावाची अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेतही गरिब घरचे बरेच विद्यार्थी जोगदंड सरांच्या मदतीने शिक्षण घेतात.
मी माझे स्वतःचे एक उदाहरण सांगू इच्छितो की ०१ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर माझा विधान संविधानकाराचे हा संपादित ग्रंथ मी आदरणीय जोगदंड सरांच्याच सहकार्याने प्रत्यक्षात आणला.कारण तो ग्रंथ छापण्यासाठी माझ्याकडे पुरेसे आर्थिकबळ नव्हतं आणि ग्रंथ छापायची तर तीव्र इच्छा होती.ती इच्छा पाहून आदरणीय जोगदंड सरांनी अतिशय कमी वेळात तो ग्रंथ अगदी उत्कृष्टरित्या छापून दिला व त्या ग्रंथाच्या प्रकाशनापर्यंत सरांनी आवर्जून सहकार्य केले.
त्याबद्दल जोगदंड सरांचे मनस्वी आभार.
जोगदंड सरांचा आणखी एक विशेष आवर्जून सांगण्यासारखा म्हणजे त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आपल्यापरिने होईल त्या स्वरूपात मदत व मोलाचे मार्गदर्शन करत असतात.जर काही कारणामुळे किंवा वेळेच्या अभावामुळे त्यांच्याने मदत करणे नाही झाले तर ते आपल्या ओळखीने गरजू व्यक्तीनां आपसात लिंक्स लावून देतात.हा एक अतिशय महत्त्वाचा व चांगला गुण सरांत आहे.
मी पहिल्यांदा माझ्या पुस्तकानिमीत जेव्हा त्यांना पुण्यात भेटायला गेलो असता त्यांच्या पुणेस्थित निवासस्थानी त्यांना भेटायला बरीच आय.ए.एस.आय.पी.एस.तहसीलदार इत्यादी प्रथम श्रेणीतील अधिकारीगण व मंडळी जोगदंड सरांना भेटायला आली होती.तेव्हा जोगदंड सरांनी सर्व अधिकारी वर्गासोबत माझी वैयक्तिक ओळख करून दिली व माझ्या पुस्तकासाठी मी माझ्या सुंदर हस्ताक्षरात जे कच्चं लिखाण करून ठेवलं होतं ते माझं लिखाण जोगदंड सरांनी सर्व अधिकारी मंडळीना दाखवलं.हा मनाचा मोठेपणा आदरणीय डॉ.बबन जोगदंड संरामध्ये आहे.जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.सरांनी आपल्या अथक परिश्रमाने यशाची उंची गाठली आहेच परंतु आपल्या स्वभावाने माणुसकी देखील जपली आहे.या दोन्ही गोष्टी सरांच्या व्यक्तीमत्वात आहेत.
सध्याच्या काळात या दोन्ही गोष्टी किंवा चांगली गुण फार दुर्मिळ झालेली आहेत.या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळणे फार दुर्मिळ झालेले आहे.परंतु डॉ.बबन जोगदंड सरांमध्ये या दोन्ही गोष्टींचा एकत्रित संगम पाहायला मिळतो.या गुणामुळेच त्यांचे व्यक्तीमत्व अतिशय उजळून दिसतेय.सरांवर लिहणे म्हणजे नुसत्या चार ओळी लिहून संपवणे असं नाही.सरांचं कार्य इतकं मोठं आहे की ते केवळ एका लेखात मांडणे अशक्यच आहे.सरांबदल प्रत्येक व्यक्तीजवळ वेगवेगळे आणि अगदी प्रेरणादायी अनुभव आहेत.त्यांच्यावर लिहलेल्या द् किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग पुस्तकातून त्याची प्रचिती येते.अशा या आदर्शवत व्यक्तीमत्वाला एक कर्तृत्वदक्ष अधिकाऱ्याला आणि त्यांच्या कार्याला माझा मनापासून सलाम व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
उच्चविद्याविभूषित डॉ.बबन जोगदंड सरांची शैक्षणिक योग्यता जी कोणाही माझ्याकडे शिक्षण शिकायला पुरेसा वेळ नाही म्हणणाऱ्या माणसाला लाजवेल.
1.Ph.D.in Mass Communication & Journalism of social science stream.
2.M.M.C.J.
3.M.A.(Sociology)
4.M.A.(Political Science)
3.M.A.(Philosophy)
4.M.A.(Public Administration)
5.M.A.(Marathi)
6.M.sc (Psychology)
7.P.G.D.P.R.M.(Post graduate diploma in public relations Management).
8.D.S.M.(Diploma in school Management).
9.Library science certificate course.
10.Digital filmmaking & T.V. Media course
11.Desktop publishing course.
-Currently pursuing Some post degrees and Diploma courses.
-M.B.A.
-M.A.in Economics
Diploma in Human rights.
-Certificate course in RTI- Right to information.
डॉ. बबन जोगदंड सरांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाशनाने तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडून मिळालेले पुरस्कार:
१.मास्टर आँफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अतिशय नावाजलेल्या परिक्षेत संपादकीय लेखन या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पी.जी.रांजणीकर पुरस्कार,१९९९.
२.कालकथित तुकाराम गायकवाड आष्टा,कासार जि.उस्मानाबाद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रशासकीय योगदानाबद्दल समीक्षा प्रेरणा पुरस्कार,२०१८.
३.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था शिवणे,पुणे यांच्या वतीने समाज भुषण पुरस्कार,२००८.
४.सत्यशोधक विचारमंच यांच्या वतीने सत्यशोधक समाज भुषण पुरस्कार,२०११.
५.डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व बहुजन टायगर युवा फोर्स नांदेड यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार,२०१४.
६.अशोक सर्वांगीण विकास सोसायटी पिंपरी पुणे यांच्या वतीने समाज भुषण पुरस्कार,२०१५.
७.सिटेक्स एनर्जी लिमिटेड दुबई यांच्या वतीने लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड,२०१९.
८.मानवतावादी बहुउदेशीय संस्था व धम्मज्योती संपादक मंडळ नाशिक यांच्या वतीने मानवतावादी पुरस्कार,२०१७.
९.गंगाधर पांपटवार स्मृती जीवन गौरव पुरस्कार,२०१८.
१०.उस्मानाबादचे यशपाल सरोदे यांच्या वतीने सम्राट अशोक व चंद्रगुप्त मौर्य पुरस्कार,२०१५.
इत्यादी पुरस्कार सरांना मिळालेले आहेत.सरांचं कार्यच इतक्या उच्च दर्जाचं आहे की समाजाकडून त्या कार्याची दखल घ्यावीच लागेल.असे असूनही सरांना पुरस्काराची कसलीही अपेक्षा नसते.बऱ्याच वेळा ते पुरस्कार समारंभ टाळण्याचा प्रयत्न करतात व आपले कर्तव्य फार चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात.सरांच्या कार्यामुळे त्यांचा प्रभाव बौद्ध समाजासहीत इतर समाजबांधवांवर सुद्धा दिसून येतो.म्हणूनच महामानव बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा (Key-post) मिळवा.कदाचित बाबासाहेबांना असाचं अधिकारी अभिप्रेत असावा.थांबतो..जयभीम!!
विनम्र:
अँड.के.टी.चावरे,उच्च न्यायालय, मुंबई.
बी.एस.एल.,एल.एल.बी., एल.एल.एम.डी.सी.एल.
(Cyber-Law) एम.बी.ए.इन ह्युमन रिसोर्सेस मेनेजमेंट.मो.9309770054,9552818960
वकील साहेब आपण खूप मेहनत घेऊन माझ्यावरील लेख तयार केला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार....
उत्तर द्याहटवाDon't mention sir it is for my pleasure
हटवाअतिशय मेहनत घेवून जो लेख आपण लिखान केलात खरोखर मी मंत्रमुग्ध झालो. मला नवीन प्रेरणा ऊर्जा प्राप्त झाली. अभ्यास पूर्ण आपण जो लेख सादर केलात सर आपणास माझा प्रणाम..
उत्तर द्याहटवा