मुख्य सामग्रीवर वगळा

समान नागरी कायदा म्हणजे काय ?


समान नागरी कायदा (UNIFORM CIVIL CODE) म्हणजे नक्की काय ? ।। समान नागरी कायद्याने खरंच आरक्षण रद्द होणार का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

आज आपण पाहणार आहोत समान नागरी कायदा या विषयीची माहिती. समान नागरी कायदा हा शब्द आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो, वापरत असतो, आज पाहणार आहोत नेमकं समान नागरी कायदा म्हणजे काय आहे ? समान नागरी कायदा हा शब्द आपल्या पैकी सर्वजण खूप वेळा ऐकत असतात. अनेक जण समान नागरी कायदा लागू व्हावा म्हणून आग्रही असतात. तरीहि अनेकांना समान नागरी कायदा म्हणजे काय ? आणि तो लागू झाल्यास काय बदल होतो ? याची कल्पनाच नसते.

तरीही अनेकजण त्याची मागणी करतात. त्यासाठी राजकीय कारणे असतात. अनेकांना असं वाटतंय की, समान नागरी कायदा ने हिंदू आणि मुसलमान यांना एकच न्याय प्रणाली लागू होईल. तर अनेकांना असं वाटतं की आरक्षण जाऊन सर्वांना समान संधी मिळते. पण यात खूप मोठी तफावत आणि गैरसमज आहे. समान नागरी कायदा हा यापेक्षा वेगळा आहे आणि तो इतका गुंतागुंतीचा होत आहे.

आज आपण हेच जाणून घेणार आहोत समान नागरी कायदा म्हणजे काय? :भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार जर त्याची विभागणी करायची झाली तर, ती दोन प्रकारात करता येईल. १. एक म्हणजे नागरी कायदा आणि २. दुसरे म्हणजे गुन्हेगारी कायदे.

भारतात गुन्हेगारी कायद्यांमध्ये सर्व गुन्हेगारांना समान शिक्षा असते. तिथे त्यांचा जात किंवा धर्म अजिबात पाहिला जात नाही. मात्र नागरी कायदे अर्थात कुटुंब कायदे हे धर्मानुसार लागू होतात. आपल्याकडे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे पर्सनल लॉ आहे. भारतात मुस्लीम, पारशी आणि ख्रिश्चन धर्मासाठी वेगळे पर्सनल कायदा लागू आहेत. तर हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन यांच्यासाठी “हिंदू कुटुंब कायदा” लागू आहे.

त्यानुसार त्यांच्या प्रकरणांचे न्याय निवाडे केले जातात. कौटुंबिक प्रकरणे हाताळताना या कायद्यांचा आधार घेतला जातो. त्यामध्ये घटस्फोट, विवाह, मालमत्ता विभागणी, वारसा हक्क प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे असतात. आणि अनेकदा ही प्रकरणे सोडवताना कोर्टाला अनेक मर्यादा येतात. त्यामुळे मागच्या काही महिन्यांमध्ये न्यायालयाने सुद्धा समान नागरी कायदा लागू करावा असा आग्रह केंद्राकडे लावला होता.

समान नागरी कायदा लागू केल्यानंतर नेमके काय बदल होतील? : सामान नागरी कायदा लागू केल्यानंतर प्रत्येक धर्मासाठी लागू असलेले पर्सनल लाॅ रद्द होतील. आणि तिथे एकच लाॅ लागू असेल. म्हणजे सध्या मुस्लिम धर्मासाठी असलेले तलाख किंवा वारसा हक्काचे त्यांचे कायदे आहेत ते, पुढे त्यांना वापरता येणार नाही. तिथे त्यांना एकच लाॅ वापरावे लागेल जो जो संपूर्ण देशासाठी असेल. हा लाॅ आल्यानंतर प्रत्येकासाठी एकच कायदा लागू असेल जो कायदा कोणता असेल? ते आपल्याला ठरवावे लागेल.

किंवा त्याची मांडणीही नव्याने करावी लागेल. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर लग्न, अंत्यविधी, घटस्फोट, वारसा हक्क यांमध्ये कसलेही वेगळेपणा नसेल. सगळ्यांसाठी एकच कायदा असते. मुलं दत्तक घेणं, मुलगा किंवा मुलीचा हक्क, भाऊ-बहिणीच्या हक्क, लग्नाआधी आणि लग्नानंतर चे हक्क या सर्व गोष्टींमध्ये वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळे क्षेत्राच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याकडे आहे.

या सगळ्या प्रथा आणि परंपरा एकाच कायद्याखाली येते आणि काही अंशी की अडचण सुद्धा निर्माण होतो. आणि हीच अडचण आपण पाहणार आहोत.
समान नागरी कायद्याची तरतूद ही भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये आहे मात्र आजवर तो लागू झाला नाही. समान नागरी कायदा लागू करणे आव्हानात्मक आणि तितकच गुंतागुंतीचं आहे.

कारण भारत हा विविधतेत एकता सांगणारा देश आहे. प्रत्येक धर्माचे, जातीचे आणि भागाची, वेगवेगळे संस्कृती आपल्याकडे अस्तित्वात आहे. आणि या सगळ्यांसाठी एकच कायदा आणला तर अडचण उभी राहतील. आपल्याकडे एकाच धर्मात अनेक संस्कृती नांदतात. धर्म एकच असला तरी विवाहाच्या पद्धती आपल्याकडे वेगळे आहे. दक्षिण भारतात मामा भाचे यांचे लग्न होऊ शकतो, पण उत्तर भारतात असं केलं तर ते पाप मानला जातो. आपल्याकडे मामाच्या मुलीशी किंवा मामाच्या मुलाशी लग्न केलं जातं, पण उत्तरेकडे किंवा नैऋत्येकडे असा होत नाही.

अशा अनेक अडचणी यातून यातून निर्माण होणार आहे आणि त्यातूनच मार्ग काढणं आणि पुढे जाणं गरजेचं असणार आहे. तर समान नागरी कायदा लागू होनं आणि त्याची अंमलबजावणी करणं सोपं ठरेल. मध्यंतरी शाळा-महाविद्यालयात फक्त गणवेश असावा की, स्वतःच्या धर्मानुसार वेगळा पेहराव करता यावा यासाठी बराच मोठा वाद उभा राहिला होता. त्यातूनच पुढे समान नागरी कायद्याचा विषय ऐरणीवर आला. हा विषय नेहमीच पुढे येत असतो . जर कधी समान नागरी कायदा लागू झाला तर लग्न, घटस्फोट आणि संपत्ती वाटप हे सगळे कायदे सगळ्यांसाठी समान असतील.

आणि सध्या जे कायदे अस्तित्वात आहे ते पर्सनल लाॅ रद्द केले जाते. युनिफॉर्म सिव्हिल कोड चा अर्थ म्हणजे असा एक समान कायदा जो लागू झाल्यानंतर त्याचा कुठल्याही धर्माची संबंध नसेल, म्हणजेच जर समान नागरी कायदा लागू झाला तर भारतातील सर्व लहान-मोठ्या धर्मांना एकसारखाच कायदा लागू असले. हा कायदा लागू करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार यांचे आहे.

मात्र यापैकी कोणी तशी फारशी तयारी दाखवत नाही. केंद्राने हा कायदा आणला आणि त्यातून प्रदेशानुसार जर काही गुंतागुंत झाली, तर राज्य सरकार त्यात योग्य तो बदल करून आपल्या संस्कृतीशी तडजोड करू शकतो. त्यामुळे प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कधी होते? हे महत्त्वाचा आहे. मात्र तत्पूर्वी हा कायदा नेमका कसा आहे हे सुद्धा आपल्या लक्षात असणे गरजेचे आहे.

- ॲड. के. टी. चावरे
जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या अट्रोसिटी कायदा व त्या संबंधित सम्पूर्ण आवश्यक माहिती जी प्रत्येक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला माहिती असायलाच पाहिजे.

अट्रोसिटी ऍक्ट अट्रोसिटी  कायद्याला मराठीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,1989 असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघाचा मानवी हक्क जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास चाळीस वर्षे लोटल्यानंतर भारतातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी हा कायदा करावा लागला.हा कायदा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या रक्षणासाठी तयार केला गेला आहे ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे.परंतु हे रक्षण नेमके कोणापासून व का हा फार मोठा प्रश्न उपस्थित होतो.हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याचं उत्तर देताना भारताच्या पुर्वइतिहासात जाऊनच आपल्याला पाहावं लागेल तोपर्यत त्याचा व्यवस्थित उलगडा होणार नाही. भारतामध्ये हजारो वर्षापासून इथल्या उच्चवर्णीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इथे हजारो प्रकारच्या जाती निर्माण केला आहेत व आपली वर्चस्ववादी व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे.म्हणून यामध्ये जातीचा विचार करत असताना वर्णाचा विचार सुद्धा करावा लागेल.कारण या सर्व जाती या वर्णातुनच आलेल्या आहेत. भारतातील वर्णव्यवस्था...

डॉ. बबन जोगदंड-माणसातील अधिकारी व अधिकाऱ्यातील माणूस एक प्रचंड सकारात्मक उर्जा असलेलं आदर्श व्यक्तीमत्व!-अँड.के.टी.चावरे (उच्च न्यायालय मुंबई)

व्यक्तीपरिचय: डॉ.बबन जोगदंड हे महाराष्ट्र शासनाच्या ' यशदा ' या शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये गेल्या 16 वर्षांपासून संशोधन अधिकारी या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.या संस्थेमध्ये ते स्वतः वर्ग-1 च्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतात.त्याचबरोबर ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही नियमित मार्गदर्शन करत असतात.त्यांनी गेल्या सहा वर्षापूर्वी पुण्यामध्ये स्वयंदीप करियर अकॅडमी ही गरीब व होतकरू मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची अत्यंत दर्जेदार अकॅडमी सुरू केली आहे.आतापर्यंत येथून अनेक विद्यार्थी घडले आहेत व बरेच जण अधिकारी पदावर पोहचले आहेत.जोगदंड सरांचे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात वेगवेगळे वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके यामध्ये सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात.विशेषत: शासनाच्या ' लोकराज्य' या लोकप्रिय मासिकात सुद्धा ते सातत्याने स्पर्धा परीक्षेसंदर्भात लिखाण करत असतात.त्यांनी आतापर्यंत 20 विषयात पदव्या संपादन केलेल्या असून पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात पी.एच.डी ही सर्वोच्च पदवी प्राप्त केलेली आहे. अत्यंत बिकट व प्रतिकूल परि...

भारतीय महीलांचे कायदेविषयक हक्क,अधिकार व कर्तव्य. प्रत्येक भारतीय स्त्रीने जाणून घ्यायलाच हवे असे कायद्याचे अतिशय उपयुक्त ज्ञान.

भारतीय महिलांचे हक्क,अधिकार व जबाबदारी:भाग-१ मित्रांनो,आज आपण आपल्या भारतीय स्त्रियांचे आपल्या कायद्यातील हक्क व अधिकार जाणून घेणार आहोत.आजची पोस्ट लिहण्यामागचा जो उद्देश आहे तो आपल्या भारतीय महिलांना आपले हक्क व अधिकार काय आहेत हे माहिती असावे व महिलांना कायदा साक्षर करणे हा एकमेव उद्देश आहे.आज बहुतांश महीलांना त्यांच्यासाठीच असलेल्या आरक्षणातील तरतुदी माहिती नाहीत.कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा व त्यावरील  उपाय काय या गोष्टी माहिती नाहीत.तसेच आज जवळपास बहुतांश महिला या आपल्या खाजगी व सरकारी कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत त्यांचे प्रचंड लैंगिक शोषण केल्या जाते तरीही आपल्या महिला तशाप्रकारचे लैंगिक शोषण निमुटपणे सहन करत असतात.पण बहुतांश महीलांना त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि कायदे आहेत हे माहित नाहीत आणि ज्या महीलांना याबद्दल माहिती असते अशा महिला पोलिसात तक्रार द्यायला भीत असतात.आज महीलांंसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे,विधी सेवा प्राधिकरण आहे इत्यादी बरीच मदत केंद्रे आहेत पण आपली भारतीय स्त्री ही कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे स्वतावरिल झालेल्या अत्याचारालाही वाचा...