मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

समान नागरी कायदा म्हणजे काय ?

समान नागरी कायदा (UNIFORM CIVIL CODE) म्हणजे नक्की काय ? ।। समान नागरी कायद्याने खरंच आरक्षण रद्द होणार का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून ! आज आपण पाहणार आहोत समान नागरी कायदा या विषयीची माहिती. समान नागरी कायदा हा शब्द आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो, वापरत असतो, आज पाहणार आहोत नेमकं समान नागरी कायदा म्हणजे काय आहे ? समान नागरी कायदा हा शब्द आपल्या पैकी सर्वजण खूप वेळा ऐकत असतात. अनेक जण समान नागरी कायदा लागू व्हावा म्हणून आग्रही असतात. तरीहि अनेकांना समान नागरी कायदा म्हणजे काय ? आणि तो लागू झाल्यास काय बदल होतो ? याची कल्पनाच नसते. तरीही अनेकजण त्याची मागणी करतात. त्यासाठी राजकीय कारणे असतात. अनेकांना असं वाटतंय की, समान नागरी कायदा ने हिंदू आणि मुसलमान यांना एकच न्याय प्रणाली लागू होईल. तर अनेकांना असं वाटतं की आरक्षण जाऊन सर्वांना समान संधी मिळते. पण यात खूप मोठी तफावत आणि गैरसमज आहे. समान नागरी कायदा हा यापेक्षा वेगळा आहे आणि तो इतका गुंतागुंतीचा होत आहे. आज आपण हेच जाणून घेणार आहोत समान नागरी कायदा म्हणजे काय? :भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार जर त्याची विभागण...

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!

मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच  केशवानंद भारती   ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure )  समजून घेणार आहोत. केशवानंद भारती  ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...

एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं!

एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं! "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित. तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे". या महान कवितेतील उक्तीप्रमाणे आपल्या जीवनाची नौका चालवणारं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं म्हणजे 'एड.रमेश एस. उमरगे' (अण्णा).  ही कविता आम्हाला आमच्या बालपणी शालेय जीवनात शिक्षकांनी शिकवली होती. तेव्हा कवितेचा अर्थ, मतितार्थ कळाला नाही. परंतु जसे जसे वय वाढत जाऊन माणसाच्या बौद्धिक क्षमतेत वृद्धी होते. तसे त्यांना लहानपणी त्याच्यावरील झालेल्या संस्काराचा, चांगल्या गोष्टीचा अर्थ कळू लागतो. हा अर्थ कळण्यासाठी माणसाच्या केवळ वयातच वृद्धी व्हावी लागते असे नाही तर त्याला जीवन जगत असताना बरे वाईट अनुभवही यावे लागतात. तेव्हा कुठे अशा कवितांचा खरा अर्थ असो किंवा एखाद्या महान संतांच्या उक्तींचा, कवनांचा, शास्त्रातील सिद्धांताचा, महापुरूषांच्या विचारांचा खरा अर्थ कळतो. त्यानंतरच मग प्रत्येक माणसांची जगाकड...

जाणून घ्या! बदनामी (Defamation) किंवा बेअब्रू म्हणजे नेमकं काय? भारतीय दंड संहिता या कायद्यानुसार या गुन्ह्याची व्याख्या!

बदनामी किंवा अब्रूनुकसान म्हणजे नेमके काय? आपण आज सर्वत्र पाहतो की,सध्याचे सामाजिक वातावरण फार बिघडत चाललं आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी ज्या काही अपायकारक गोष्टी आहेत त्या गोष्टीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. विविध सामाजिक मुल्य, आदर्श, धार्मिक, सामाजिक वातावरण यात फार मोठ्या प्रमाणात तफावत आलेली आहे. व्यक्तींच्या जगण्यात खूप मोठा बदल झालेला आज दिसून येत आहे. या सदरील बदलामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये दुरावा, गैरसमज, त्वेष,असुरक्षिततेची भावना फार मोठ्या प्रमाणात वाढतेय. यावर राग किंवा बदला घेण्याची जी वृत्ती आहे त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून काही लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे खुनशी भावनेने वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे हा एक प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यात भर म्हणून सध्या सोशल मीडियावर बदनामी करण्याचं प्रमाणही फार वाढलेलं आहे. या सर्व बेकायदेशीर गोष्टीना भारतीय दंड संहितेचं कलम-४९९ मध्ये फार विस्तारितपणे सांगितलं आहे. अतिशय सटीक अशी व्याख्या या कलमामध्ये केलेली आहे. " जो कोणी व...

जाणून घ्या कोरोना Covid-19 संसर्गजन्य रोगामुळे देशात निर्माण झालेल्या कलम-144,लॉकडाउन, (Lockdown) संचारबंदी,(Curfew)अलगीकरण (Quarantine) इत्यादी कायदेशीर बाबी.भाग-1

मित्रांनो सध्या संपूर्ण जगभरात  कोरोना COVID-19  नावाच्या रोगाने थैमान घातले असुन विविध देशात हा रोग आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.त्यामध्ये  सामाजिक विलगीकरण (Social Distancing) (Quarantine) संचारबंदी (Curfew) Lockdown कलम-144  इत्यादी प्रकारचे प्रयोग आपापल्या सरकारकडून जनहितार्थ केले जात आहेत जे करणे अत्यंत आवश्यक व गरजेचं आहे.त्याशिवाय अन्य कुठला त्यावर पर्याय नाही.कारण या कोरोना नावाच्या विषाणूमुळे जो काही रोग,आजार पसरलेला आहे त्यावर अजूनही कसल्याच प्रकारची लस किंवा औषध निघालेलं नाही.म्हणून सध्या तरी आपल्याला वरील जे काही उपाय आहेत त्याच उपाययोजनांंचा आधार घ्यावा लागणार आहे.त्याशिवाय अन्य कोणताही उपाय सध्यातरी उपलब्ध नाही यामध्ये दुमत नाही. परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे जे काही उपाय आहेत जसे सामाजिकअलगीकरण,कलम-144,संचारबंदी इत्यादी गोष्टी नेमक्या काय आहष'''''हेत हे अजूनही बहुतांश जनतेला पुर्णपणे समजलेले नाही.म्हणून या लेखात या सर्व बाबी व त्यातील महत्त्वाचे फरक आपण समजून घेणार आहोत कलम-144  म्हणजे काय? कलम -144 हे 'सी.आर.पी.सी' ...

My upcoming second edition of Best editorial book on 'Ambedkarism' in English language 'Quotes of Ambedkar' i.e.part-2 of 'Vidhan Sanvidhankarache' on the occasion of upcoming Ambedkar Jayanti,' By-Adv.K.T.Chaware

I wish you very happy Quasquicentennial (130th) Birth Anniversary of BabaSaheb Dr.Ambedkar! Friends ! I am delighted to introduce this volume of essential principles of Ambedkarism-compiled and edited by our brilliant lawyer and the editor of this book Adv.Kiran Chaware  Friends, this volume covers the essential principles of Baba Saheb Dr.Ambedkar right from the beginning of the Era of Ambedkarism in 1920 to mass conversion to Buddhism by organising Dhamma-Deeksha in 1956 at Nagpur.   Though, the present volume does not classify these principles into various fields and subjects of Ambedkarite thought,  the same would be rectified in the future edition of this important book. However, these principles of Ambedkarism covers the Idea of Liberation from slavery, Constitution and Constitutionalism, Law and Democracy, Politics and Hero Worship, the Solution of Political Power and means to appropriate it, Hindu Religion of hatred, contempt, inhumanity a...